आजचा विषय जरा वेगळाच आहे ना ? माहित आहे मला तुम्ही वाचून थोडे गोंधळाल... खरेच विषय थोडा हटकेच आहे "विवाह प्रेम आणि नाते..."
होय विवाह दोन प्रकारचे असतात. एक प्रेम-विवाह, आणि एक घरच्यांनी ठरवून दिलेल्या जोडीदारासोबत घडून आलेला पारंपारिक पद्धतीचा विवाह. आता ह्यात काय? बरोबर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण थांबा ही तर सुरुवात आहे.
बरे आता एक सांगा बरे प्रेम म्हणजे काय? हं ... थोडेसे अवघड आहे ना? तरी प्रेम म्हणजे जिव्हाळा, माया, एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी.. नाना प्रकारे सांगण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.
बरे आता नाते म्हणजे काय सांगता येईल ?
...... नही ना? थोडेसे जास्तच कठीण वाटते ना? आहेचय हे थोडे कठिण.
आपण नेहमी म्हणतो , "लग्न झाले कि प्रेम वाढते आणि ह्यातून नंदनवन फुलावे असे सुरेख नाते दोन जीवांमध्ये तयार होते."
पण मला सांगा असे आपल्या किती जणांच्या आयुष्यात घडले आहे?
आज थोडा विचार करण्याची वेळ वाटली मला म्हणूनच हा विषय.
लग्न शब्द ऐकला तर काहीना स्वतःचा लग्न सोहळा आठवेल. काहीना आपल्या मुलांच्या लग्नातली धावपळ डोळ्यासमोर येईल, काहीना आपण कसे पळून जाऊन लग्न केले ह्या भूतकाळच्या कडू-गोड आठवणीनी अंगावर काटा उभा राहील.. आणि काही आपले लग्न होणार म्हणून विचारात रममाण होतील.
ह्या लग्न करणाऱ्या आणि लग्नाला मानणाऱ्या लोकांचा प्रांत दोन भागात विभागलेला आहे. तो म्हणजे Love Marriage आणि Arrange Marriage. ह्या दोन लोकांमध्ये नेहमी तू-तू-मी-मी चालते. Love marriage मानणाऱ्या लोकांना नेहमी वाटते अरे काही लोक कसे एका अनोळखी माणसा सोबत राहतात. आणि Arrange marriage मानणाऱ्या लोकांना प्रेम-विवाह तुच्छ वाटतो.
काय कारण आहे बरे ह्याच्यात असे दोन भाग झाले... त्याला कारण आहे ते म्हणजे लग्न नंतर होणारे मतभेद, भांडणे. आणि परिणामी संसाराची होणारी विटंबना. "एका अनोळखी माणसासोबत लग्न केल्याने असेच होणार", किवा "मोठ्यांचे न एकता स्वतःचेच खरे करणार तर असेच होणार" म्हणून त्यांची अवहेलना होते. पण का हो कधी हा विचार केला आहे का, की जशी भांडणे अनोळखी लोकांमध्ये होतात तशीच ओळखीच्यांमध्ये सुद्धा होतात. त्याला कारणे काय आहेत महित आहेत?
चला तर आज आपण टीका करण्यापेक्षा थोडा वेळ कारणे शोधूया...
लग्न म्हणजे एक बंधन हे सात जन्म पलीकडच्या पवित्र नात्यांच्या आशीर्वादाने बांध्याला जाते. इतके पवित्र बंधन आपण मंडपात शुल्लक गोष्टींमुळे खराब करून घेतो आणि ती सल मनात धरून संसाराची पहिली पायरी चढल्या जाते. मनातल्या प्रेमाच्या झऱ्यावर कधी त्या छोट्याश्या सलीचे शेवाळ तयार होते ते कळतच नही. आणि मग प्रेमच फुलले नही तर नंदनवन कसे तयार होणार. आणि खऱ्या अर्थाने नाते कसे तयार होणार? ह्यासाठी लक्ष्यात आले कि लगेच ह्या शेवाळाला स्वतः आधी साफ करणे गरजेचे नही काय?
बरे पण का हो प्रेम विवाह करणारी, प्रेमासाठी जीवाला जीव द्यायला लावणारी आग मनात बाळगणारी मंडळी त्यांचे काय? ते का वेगळे होण्याचा विचार करतात? अहो एक दिवस चेहरा नही पहिला तर जीव जावा, आणि एक दिवस "इथून पुढे तुझे तोंड पहिले तर जीव देयीन" म्हणून गर्जना करताना आढळतात. त्यांच्यात एकच गोष्ट असते. अहंकार.. होय हा अहं प्रेमात आला की काश्याचे प्रेम काश्याचे लग्न काश्याचे नाते. सगळे बेचिराख. काय हरकत असते आपल्या प्रेमासाठी थोडी माघार प्रत्तेकाने घेतली तर... अर्थातच हि गोष्ट दोन्ही जीवांनी तितक्याच तोला-मोलाने सांभाळायला हवी.
आज च्या युगात आपण लग्न हि एक गरज मानतो,.. आणि मग गरज कश्या प्रकारात समोर येईल हे नही. परिणामी गरज भागते पण समाधान मिळत नही. खरे तर लग्न हे मनावरचे संस्कार आहेत. ते प्रत्तेकाने स्वतः सोबत उपजतच आणले असतात. ते संस्कार मनावर घडवण्याचा उशीर असतो ते काम तर प्रत्तेकाला स्वतःलाच करावे लागणार आहे. आणि हे जेव्हा होयील तेव्हा नक्की म्हणता येईल की "लग्न झाले कि प्रेम वाढते आणि ह्यातून नंदनवन फुलावे असे सुरेख नाते दोन जीवांमध्ये तयार होते."
कराल थोडासा विचार ?