"हॅलो"
"हॅलो ताई"
"हो गं पूर्वा, बोल."
"मला तुमच्या भावासोबत नाही राहायचे. मला काडीमोड हवा आहे."
"हो हो, पण अगं झाले तरी काय ? काही सांगशील का ?"
"काय व्हायचे ? नेहमीचेच ! भांडण ! कारण लागतं का ह्यांना भांडायला ? आणि पुन्हा माझ्यावरच येतं सगळं खापर फुटायला. मीच सुरु करते ना भांडण... ताई तुम्ही काहीही म्हणा मला काडीमोड हवाय."
"बरं, बरं मी बोलू का पंकजशी ? "
"काही नको, पुन्हा तिखट मीठ लावून माझ्याच नावावर फोडणी बसते."
"बरं ... राहिलं ! नाही विचारत आणि तुला सुद्धा भांडणाचे कारण नाही विचारत. पण पूर्वा, तू जे काही बोलत आहेस ना त्यात कितीसं सत्य आहे हे तरी तू तपासून पहिले आहेस का ?
नाही म्हणजे, तू आधी शांत हो, चूक तुझी का त्याची हे पण नको लक्षात घेऊ. पण तुम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकणार आहेत का ?"
"हो मी राहीन. तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी. आहात ना ताई ?"
" हो गं बाई, मी आहे. मी कुठे जाते तुला एकटीला सोडून."
"मग तर झालं , माझा निर्णय पक्का आहे. मला काडीमोड हवाय. मी राहू शकते पंकजशिवाय. तशीही माझी कोणतीच कामे त्यांच्यामुळे अडत नाहीत. तितकी तरी मी समर्थ आहे."
"बरं कळलं ! पण मी आत्ताच तुझ्या निर्णयाला संमत्ती देणार नाही. माझी एक अट आहे."
"मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. नेहमीच्या त्रासातून तरी मुक्त होईन मी."
"अगं माझी अट तरी ऐक... माझी अट अशी आहे कि हेच वाक्य, 'पंकज आणि तू एकमेकांशिवाय राहू शकता ', हे मला तुझ्या तोंडाने ऐकायचे आहे आणि आत्ता नाही उद्या. मी फोन करेन तेव्हा मला हेच वाक्य इतक्याच ताठरतेने ऐकवायचे. तेव्हा मी तुझे म्हणणे मान्य कारेन. "
( फोन ठेवल्याचा आवाज )
"हूश्श्...!!"
"काय गं ? कोण होते फोन वर ?"
"आहो काही नाही हो, आपली पूर्वा.."
"काय म्हणते ? कसं चाललंय त्या दोघांचं ?"
"काही नाही थोडीशी अशांत होती."
"म्हणजे पुन्हा भांडण की काय ? काय म्हणावे त्या दोघांना ? किती भांडणं करतात !"
"आहो असं काय म्हणता ? कुठे भांडण ? थोडेसे मतभेद झालेत बाकी काही नाही !"
"हो. .. मी ऐकले बरें थोडे फार! म्हणे मतभेद झाले..., काडीमोड ची भाषा का वापरात होते मग ते?"
"काही नाही हो ... टोकाला जाण्याची दोघांची सवय. आपला पंकज पण काही कमी नाहीये ह्या बाबतीत."
"उगीच पंकज ला दोष देऊ नकोस अनु. पूर्वा बायको आहे त्याची. तिने नको का समजावून घ्यायला ? "
"हो? का पंकज ने घेतले तर काय हरकत आहे ?"
"पण पंकज कसा समजावून घेणार? समजावून घेण्याचे काम तरबायकोचे असते. "
"हे बरे आहे तुमचे.. . पंकज आपले नाव घेऊन जन्माला आला म्हणून तो आपला आणि पूर्वा ? ती आपल्या घराण्यात जन्माला आली नाही म्हणून ती परकी ? आहो ती तर आता आपल्याच घराण्याची झाली आहे ना ?"
"अगं तसं नाही म्हणायचंय मला, पण काहीही म्हण मला काही ह्यांची भांडण पटत नाहीत बघ."
"तसं नाही हो, अजून लहान आहेत दोघे. सोबत राहतात, मतभेद होतात.
आणि हे बघा, काहीहि म्हंटलं तरी ते एकमेकांना सोडून एक क्षण राहू शकत नाही. मला खात्री आहे ह्याची."
आणि हे बघा, काहीहि म्हंटलं तरी ते एकमेकांना सोडून एक क्षण राहू शकत नाही. मला खात्री आहे ह्याची."
"हो तुला खूप खात्री असेल गं, पण हे त्यांना कळायला नको का ?"
" कळतं हो, त्यांना सुद्धा कळतं. एकमेकांना बोलताना वाट्टेल ते बोलतात. भांडताना समोर कोण आहे ह्याचा विचार पण करत नाहीत. पण..."
"अगं पण मग भांडणं का करावीत ?"
"होतात मतभेद, मग एकमेकांच म्हणणं कसं बरोबर आहे हे पटवून देता देता समोर वैरी उभा आहे हा अविर्भाव उत्पन्न होतो...
आणि का हो ? आपण पण असेच भांडायचो ना अमोघ ? पण आत्ता वेळ तरी असतो का भांडायला ? आयुष्य जसं जसं समोर नेतं माणसाला तसं तसं सुटत गेलेल्या आयुष्याची किंमत कळते.
आणि हो अमोघ, त्यांचं हे भांडण आजचे नाहीये. आता किती महिने झाले आहेत आपण नेहमी त्यांचे भांडण ऐकत आलो आहोत.
पण खरं सांगू, त्यांची भांडणं हे प्रेमापेक्षा दृढ आहेत. एक माहित आहे ? माणूस जितका मनातून प्रेम करत नाही, त्याहून कयेक पटीने वैर निभावतो.
आणि इथे ह्या दोघांना वाटतं कि आपण आपल्या वैऱ्याबरोबरच भांडत आहोत. पण वेड्यांना हे कळत नाहीये, की ते दोघे एकाच बाजूला आहेत. त्यांचे भांडण म्हणजे, एखाद्या तलवारीचे तिच्याच सोबती ढालीसोबत चाललेले भांडण आहे.
ह्या ढाल-तलवारी मध्ये ढालीने समजुतीने घ्यायला हवे आणि ही ढाल तेच विसरते. ती हे विसरते की तलवार ही वार करण्यासाठी जन्माला आली आहे आणि ढालीने कायम संरक्षण केले पाहिजे. हे नाते जिवंत ठेवण्यासाठी ढालीची कामगिरी प्रथमदर्शनी असायला हवी.
आणि अमोघ ह्यात ढाल म्हणजे दुसरे कोणी नाही तर पंकज आहे आणि पूर्वा ही तलवार आहे. पण तिची धार कमी करण्याचे काम हे ढालीचेच असते.
हे कधी कळणार आहे पंकजला ? "
"तू पण ना अनू, कधी संदर्भासह स्पष्टीकरण द्यायचे नकोस सोडू. पण हो, तुझे म्हणणे अगदी पटले मला. उद्या बोलू त्या दोघांना. चल झोप बघू आता."
ट्रींग ... ट्रींग ...
"हॅलो"
"हॅलो पूर्वा "
"हॅलो ताई, बोला "
"काय चाललंय कुठे पर्यंत आले मग तुमचे भांडण ? काडीमोड हवाय ना ?"
"तुम्ही पण का हो ताई, माझीच खिल्ली उडवत आहात. जणू काही मी एकटीच भडकले होते काल ?"
"नाही गं बाई माझी, तुझी चेष्टा करत होते. म्हंटले होते ना मी की तू मला आज ते वाक्य नाही म्हणू शकणार. बरे पंकज आहे का तिकडे ? "
"हो आहेत, देते हं "
"हॅलो ताई"
"काय चाललंय? "
"काही नाही गं ताई, कामावर जाण्याची तयारी. आणि हो कालच्या प्रकरणाची तू नकोस काळजी करू. मी आहे ना. काल थोडी चिडचिड झाली होती बाकी काही नाही."
"अनू, पंकज आहे का ग फोने वर ? मला जरा दे बरे, बोलायचे आहे त्याच्याशी काही महत्वाचे.. "
"हो, घ्या"
"हॅलो पंकज, कसा आहेस रे ?"

"हॅलो दादा, मजेत आहे तुम्हीच सांगा"
"काही नाही रे बाबा, काल तुमचे भांडण झाले आणि मला एक व्याख्यान ऐकायला मिळाले तुझ्या ताईकडून. पण हो ती जे काही म्हणाली ना ते सगळे अगदी पटले बरे मला.
पंकज तुला एक सांगतो.. पुरुष म्हणजे ढाल आणि स्त्री म्हणजे तलवार असते आणि ढाळीचे काम कायम दोघांमधील नाते जपण्याचे असते. मी ह्यातून खूप काही शिकलो बघ काल.
पंकज, पूर्वाचा जन्मच तलवारीचे प्रतीक घेऊन झालेला आहे. ती जेव्हा वार करेल तेव्हा तूला ढाल बनून तो वार झेलायचा असतो. अगदी निर्भय, निर्भीड पणे.
तू वार चुकवलास, तर तलवार अजून जास्त आवेशाने वार करते, तिच्यात नक्कीच तितकी ताकद असते की तो आवेश पराकोटीला गेला तर ढालीला चिरून ती त्या ढालीच्या मागे असलेल्या सुरक्षित नात्याला ठार करू शकते.
म्हणून सांगतो, खंबीर उभा राहा तलावारीचा वार स्वीकारायला. कितीही वार केला तरी तू चुकवतच नाहीस म्हंटल्यावर तिचा आवेग कमी होईल आणि सतत वार केल्याने तिची धार पण कमी होईल. ती स्वतःहून शरणगती स्वीकारेल. कळतंय का ?"
"खरंय दादा तुमचं, माझ्या हे कधीच लक्षात आले नसते."
"माझे म्हणणे लक्षात ठेव कायम. कारण ढाल-तलवारीचा आवाज रणांगणात शत्रूसोबत बरोबरीने दोन हात करतानाच छान वाटतो. एकमेकांविरुद्ध शत्रुत्व पत्कारून एकमेकांवर वार करताना नाही.
बरं, पूर्वाला दे फोन, ताईला काही बोलायचे आहे तिच्याशी. "
"हो देतो. पूर्वा हा घे फोन ताईला बोलायचे आहे."
"हॅलो ताई, "
"पूर्वा, आता नीट राहायचं हं. आणि हो भांडणं भरपूर करा पण प्रेमाने. 'भांडा सौख्यभरे!!' "
"तुम्ही पण ना ताई... काही तरीच तुमचं."
"चल आता ठेवते बरे फोन. लागा कामाला."
( फोन ठेवल्याचा आवाज )
"हूश्श् .. खरंच खूप लहान आहेत हो दोघे अजून. समजेल त्यांना पण हळू हळू. "
"पण काहीही म्हण हो अनू, तू खूप समजून घेतेस. आपल्यातली ढाल खऱ्या अर्थाने तूच बनली आहेस."
"काही तरीच काय हे तुमचं ..."
"अगं, खरंच बोलतोय."
"तुम्ही पण ना अमोघ... "