Wednesday, September 19, 2012

विवाह-प्रेम आणि नाते

आजचा विषय जरा वेगळाच आहे ना ? माहित आहे मला तुम्ही वाचून थोडे गोंधळाल... खरेच विषय थोडा हटकेच आहे "विवाह प्रेम आणि नाते..."
होय विवाह दोन प्रकारचे असतात. एक प्रेम-विवाह, आणि एक घरच्यांनी ठरवून दिलेल्या जोडीदारासोबत घडून आलेला पारंपारिक पद्धतीचा विवाह. आता ह्यात काय? बरोबर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण थांबा ही तर सुरुवात आहे.
बरे आता एक सांगा बरे प्रेम म्हणजे काय? हं ... थोडेसे अवघड आहे ना? तरी प्रेम म्हणजे जिव्हाळा, माया, एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी.. नाना प्रकारे सांगण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.
बरे आता नाते म्हणजे काय सांगता येईल ?
...... नही ना? थोडेसे जास्तच कठीण वाटते ना? आहेचय हे थोडे कठिण.
आपण नेहमी म्हणतो , "लग्न झाले कि प्रेम वाढते आणि ह्यातून नंदनवन फुलावे असे सुरेख नाते दोन जीवांमध्ये तयार होते."
पण मला सांगा असे आपल्या किती जणांच्या आयुष्यात घडले आहे?

आज थोडा विचार करण्याची वेळ वाटली मला म्हणूनच हा विषय.
लग्न शब्द ऐकला तर काहीना स्वतःचा लग्न सोहळा आठवेल. काहीना आपल्या मुलांच्या लग्नातली  धावपळ  डोळ्यासमोर येईल, काहीना आपण कसे पळून जाऊन लग्न केले ह्या भूतकाळच्या कडू-गोड आठवणीनी अंगावर काटा  उभा राहील.. आणि काही आपले लग्न होणार म्हणून विचारात रममाण होतील.

ह्या लग्न करणाऱ्या आणि लग्नाला मानणाऱ्या लोकांचा प्रांत दोन भागात विभागलेला आहे. तो म्हणजे Love Marriage आणि Arrange Marriage. ह्या दोन लोकांमध्ये नेहमी तू-तू-मी-मी चालते. Love  marriage मानणाऱ्या लोकांना नेहमी वाटते अरे काही लोक कसे एका अनोळखी माणसा सोबत राहतात. आणि Arrange marriage मानणाऱ्या लोकांना प्रेम-विवाह तुच्छ वाटतो.
काय कारण आहे बरे ह्याच्यात असे दोन भाग झाले... त्याला कारण आहे ते म्हणजे लग्न नंतर होणारे मतभेद, भांडणे. आणि परिणामी संसाराची होणारी विटंबना. "एका अनोळखी माणसासोबत लग्न केल्याने असेच होणार", किवा "मोठ्यांचे न एकता स्वतःचेच खरे करणार तर असेच होणार" म्हणून  त्यांची  अवहेलना होते. पण का हो कधी हा विचार केला आहे का, की जशी भांडणे अनोळखी लोकांमध्ये होतात तशीच ओळखीच्यांमध्ये सुद्धा होतात. त्याला कारणे काय आहेत महित आहेत?

चला तर आज आपण टीका करण्यापेक्षा थोडा वेळ कारणे शोधूया...
लग्न म्हणजे एक बंधन हे सात जन्म पलीकडच्या पवित्र नात्यांच्या आशीर्वादाने बांध्याला जाते. इतके पवित्र बंधन आपण  मंडपात शुल्लक गोष्टींमुळे खराब करून घेतो आणि ती सल मनात धरून संसाराची पहिली पायरी चढल्या जाते. मनातल्या प्रेमाच्या झऱ्यावर कधी त्या छोट्याश्या सलीचे शेवाळ तयार होते ते कळतच नही. आणि मग प्रेमच फुलले नही तर नंदनवन कसे तयार होणार. आणि खऱ्या अर्थाने नाते कसे तयार होणार? ह्यासाठी लक्ष्यात आले कि लगेच ह्या शेवाळाला स्वतः आधी साफ करणे गरजेचे नही काय?
बरे पण का हो प्रेम विवाह करणारी, प्रेमासाठी जीवाला जीव द्यायला लावणारी आग मनात बाळगणारी मंडळी त्यांचे काय? ते का वेगळे होण्याचा विचार करतात? अहो एक दिवस चेहरा नही पहिला तर  जीव जावा, आणि एक दिवस "इथून पुढे तुझे तोंड पहिले तर जीव देयीन" म्हणून गर्जना करताना आढळतात. त्यांच्यात एकच गोष्ट असते. अहंकार.. होय हा अहं प्रेमात आला की काश्याचे प्रेम काश्याचे लग्न काश्याचे नाते. सगळे बेचिराख. काय हरकत असते आपल्या प्रेमासाठी थोडी माघार प्रत्तेकाने घेतली तर... अर्थातच हि गोष्ट दोन्ही जीवांनी तितक्याच तोला-मोलाने सांभाळायला हवी.

आज च्या युगात आपण लग्न हि एक गरज मानतो,.. आणि मग गरज कश्या प्रकारात समोर येईल हे  नही. परिणामी गरज भागते पण समाधान मिळत नही.  खरे तर लग्न हे मनावरचे संस्कार आहेत. ते प्रत्तेकाने स्वतः सोबत उपजतच आणले असतात. ते संस्कार मनावर घडवण्याचा उशीर असतो ते काम तर प्रत्तेकाला स्वतःलाच करावे लागणार आहे. आणि हे जेव्हा होयील तेव्हा नक्की म्हणता येईल की "लग्न झाले कि प्रेम वाढते आणि ह्यातून नंदनवन फुलावे असे सुरेख नाते दोन जीवांमध्ये तयार होते."

 कराल थोडासा विचार ?

Saturday, June 23, 2012

दोन मित्र, अगदी जीवा भावाचे ...

दोन मित्र, अगदी जीवा भावाचे ...
एकाचे नाव शाम तर दुसरा राकेश..
जीव इतका दोघांचा एकमेकांवर की शाळेला जाताना, घरी येताना, बाहेर जाताना नेहमी सोबत...
असे वाटावे  पाहणाऱ्याला की जणू काही सक्खे जुळे भाऊच...

दोघे एकाच वर्गात शिकायचे...
शिकता शिकता मोठे झाले, पुढच्या शिक्षणासाठी स्पर्धा सुरु झाली..
दुर्दैवाने दोघांना शिक्षणासाठी वेगळे व्हावे लागले, दोघे वेगवेगळ्या गावात, करमेना एकमेकांवाचून...
पण करणार काय, स्वप्ने होती.. ती तर पूर्ण करायची होती... 
काही महिने दर आठवड्याला भेटणे... मग काय दोन दोन दिवस गप्पा, हुंदडणे...
मग अभ्यासाचा व्याप इतका वाढला... की दर आठवड्यांची भेट महिन्यांवर व्हायला लागली...
महिन्यांनी भेटल्यावर काय काय गंमती सांगू ह्यातच दोन दिवस जायचे...

कालांतराने महिन्यांनी भेट होईना .. नौकरी चे tension, शिक्षणाचे चीज व्हावे म्हणून काम शोधणे गरजेचे..
मग कामाचा व्याप.. तरीही आठवणीने सुट्टी काढून 3-4 महिन्यांनी भेट..
वय झाले. घरच्यांना सुनमुख पहाण्याची हौस. नौकरी मिळाली... लगेच छोकरी ही मिळाली... 
एकमेकांच्या लग्नात धमाल उडवली... पुन्हा भेटण्याचे वचन घेऊन निघाले शूर-वीर लढायला, आपआपली  संसाराची रणांगणे जिंकायला...


पुन्हा  काही दिवसांनी भेटण्याचा योग तर पहा तो... दोघे आले होते एकाच गावात...
कुटुंबासहित सुट्टी घालवायला... भेटले रस्त्यात...
अचंबित झाले... " वाढलेल्या " कुटुंबाची ओळख करून देत एकमेकांना ओळखण्याचा कार्यक्रम...
खूप दिवसांनी भेट आणि त्यात वया नुसार झालेला बदल...
पुन्हा तेच भेटण्याचे वचन आणि  घेतलेला निरोप..

......पण आज खूप दिवस झाले शाम आणि राकेश भेटले नव्हते ... किती वर्ष झाली त्यांच्या भेटीला,  हे शामला पण आठवत नव्हते..
पण राकेशचा तो तजेलदार चेहरा पाहून शाम पेपर मधली बातमी वाचत होता..
                 " तीव्र हृदय विकाराने डॉ राकेश जाधव यांचे आज पाहटे निधन... " पुढे काही शाम ला वाचवेना, शामने पेपर बाजूला केला आणि सुरकुत्या पडलेल्या आपल्या गालावरचे ओघळणारे अश्रू टिपले.. 

Monday, May 21, 2012

काय सापडलं ?


आज मनाचा वेध घेतला... माहित आहे त्यात काय सापडलं ?
कोरा करकरीत पणा.. खरच आज मन खूप कोरं आहे. पण त्यावर सुद्धा अदृश्य अश्या खूप पाऊलखुणा आहेत.
काही मानवाच्या तर काही दानवांच्या..

Friday, May 11, 2012

तडजोड


:   एकाच घरात दोन माणसे न बोलता राहतात तरी कशी? 

:   नाही पटत दोघांचे , जमत नाही एकमेकांचे वागणे,  बोलणे.
    जर पटतच नसेल तर बोलणे थांबवलेले चांगले नाही का?  

:   पण इतक्या दिवसांचे प्रेम,  माया, जिव्हाळा हा असा एखाद्या विचाराच्या खटक्याने
    संपवून टाकायचा?
    म्हणून का असा कधी काळी मौनातून कळणाऱ्या प्रेमाला अबोला द्यायचा? 
    नाही पटत मनाला ...

:   काय करणार, होतात मतभेद, होतात वाद, मग भांडण...
    शेवट काय तर अबोला कधी तात्पुरता, तर कधी कायमचाच.
    धमक नसते वेगळ्या भिंती करण्याची म्हणून एकाच घरात राहणे..

:   पण का? भांडणं करावीत.. मी म्हणते अगदी कडाडून भांडणं करावीत, शिगेला पोहोचतील
    इतपत करावीत.    
    पण जर शिगेला पोहोचलेली भांडणं वापस प्रेमाने जागेवर आणण्याची धमक असेल तरच करावीत.
    नाहीतर रहा की प्रेमाने एकमेकांना समजावत, समजून घेत, एकमेकांसमोर प्रेमाने माघार घेत....  

Friday, January 27, 2012

तुझ्या वाचून....

जीवन बहाण्याने
जगणे जमेना,
विसरायचे असून तुला
विसरणे जमेना

तुझ्या त्या आठवणी
काढल्या मनीच्या,
पण काळजावरची ही रेघ
काही मिटवल्या मिटेना

का आलास जीवनी
माझ्या बहर बनून,
फुलवायची आहे ही बाग
पण तुझ्या वाचून फुलेना....      

Sunday, January 8, 2012

मन

आज मन खूप रडत आहे
का कोण जाणे दुःखाने तडफडत आहे...
आज अस वाटत आहे जणू,
खूप दिवसाची जपून ठेवलेली जखम अलगद उघडावी..
आणि ती बरी झाली हे पाहूनच दुःख वाटावं...
आज हव्या त्या  गोष्टी मिळाल्या मनाला...
पण तरी का मन आज जागेवर नाही...
माहित नाही काय हवं आहे त्याला,
ते उंच उडणं की अलगद सुखावणारा तो प्रेमाचा आधार..
पण खरच आहे काही तरी हरवल आहे त्याचं...
सगळं मिळवून काही तरी नाहीये त्याच्याकडे..
आज मन रडतंय त्याच्या त्या गोष्टीच्या आठवणीत...
नाही सांगू शकत मन, त्याला किती त्रास होत आहे..
खरच मनाची गोष्ट हरवली आहे,
का मनच हरवल आहे.. त्याचा गोष्टीसोबत?
माहित नाही पण ते निघालय शोधत ... स्वतःला, त्याचा त्या गोष्टीला स्वतःसोबत...