: एकाच घरात दोन माणसे न बोलता राहतात तरी कशी?
: नाही पटत दोघांचे , जमत नाही एकमेकांचे वागणे, बोलणे.
जर पटतच नसेल तर बोलणे थांबवलेले चांगले नाही का?
जर पटतच नसेल तर बोलणे थांबवलेले चांगले नाही का?
: पण इतक्या दिवसांचे प्रेम, माया, जिव्हाळा हा असा एखाद्या विचाराच्या खटक्याने
संपवून टाकायचा?
संपवून टाकायचा?
म्हणून का असा कधी काळी मौनातून कळणाऱ्या प्रेमाला अबोला द्यायचा?
नाही पटत मनाला ...
: काय करणार, होतात मतभेद, होतात वाद, मग भांडण...
शेवट काय तर अबोला कधी तात्पुरता, तर कधी कायमचाच.
धमक नसते वेगळ्या भिंती करण्याची म्हणून एकाच घरात राहणे..
: पण का? भांडणं करावीत.. मी म्हणते अगदी कडाडून भांडणं करावीत, शिगेला पोहोचतील
इतपत करावीत.
इतपत करावीत.
पण जर शिगेला पोहोचलेली भांडणं वापस प्रेमाने जागेवर आणण्याची धमक असेल तरच करावीत.
नाहीतर रहा की प्रेमाने एकमेकांना समजावत, समजून घेत, एकमेकांसमोर प्रेमाने माघार घेत....
नाहीतर रहा की प्रेमाने एकमेकांना समजावत, समजून घेत, एकमेकांसमोर प्रेमाने माघार घेत....
Nice one... I can relate this thought with my life, I think everybody can !!
ReplyDelete