आज मन खूप रडत आहे
का कोण जाणे दुःखाने तडफडत आहे...
आज अस वाटत आहे जणू,
खूप दिवसाची जपून ठेवलेली जखम अलगद उघडावी..
आणि ती बरी झाली हे पाहूनच दुःख वाटावं...
आज हव्या त्या गोष्टी मिळाल्या मनाला...
पण तरी का मन आज जागेवर नाही...
माहित नाही काय हवं आहे त्याला,
ते उंच उडणं की अलगद सुखावणारा तो प्रेमाचा आधार..
पण खरच आहे काही तरी हरवल आहे त्याचं...
सगळं मिळवून काही तरी नाहीये त्याच्याकडे..
आज मन रडतंय त्याच्या त्या गोष्टीच्या आठवणीत...
नाही सांगू शकत मन, त्याला किती त्रास होत आहे..
खरच मनाची गोष्ट हरवली आहे,
का मनच हरवल आहे.. त्याचा गोष्टीसोबत?
माहित नाही पण ते निघालय शोधत ... स्वतःला, त्याचा त्या गोष्टीला स्वतःसोबत...

No comments:
Post a Comment