Monday, December 12, 2011

एकांत

माझेच शब्द मी जेव्हा अर्पित स्वरांना गेलो,
स्पर्शात तुझ्या मी तेव्हा उमलीत स्वतःला गेलो!

तू गुलमोहर होऊन सजलीस केवढी तेव्हा,
अन कदंब बनुनी मी ही जाळीत स्वतःला गेलो.

त्या छंद क्षणांना आता पाचूची रत्ने फुटली
रक्तात जाणीवेचा मी घंटानाद होऊन गेलो.

शापित कहाणी ही मी अर्थ कोणता सांगू?
शोधीत तळ शब्दांचा निःशब्द होणून गेलो.

या एकांत सहवासात पोरका होऊन गेलो...

----- उदय चौधरी(वडील)
        १२/१०/१९८८

No comments:

Post a Comment