Tuesday, December 6, 2011

आयुष्य



सहज वाटलं अपल आयुष्य म्हणजे काय एका नदीच वाहन ?....
खरच आपण जगत असतो ते अगदी एखाद्या नदी सारखे वेडे होवून,
तिला खुप सारे किनारे मिळतात, 
पण ती  वेडी नदी वाहत असते आपल्या आवडत्या किनाराच्या शोधात...
तिला एक किनारा मिळतो,
तिला तो खुप आवडतो,
ती त्या किनाराच्या प्रेमात पड़ते,
वेदी त्याच्या नादात धुंद होवून वाहत असते, तिला वाटते के तो किनारा पण तिच्या सोबतच वाहत आहे...
पण तो किनारा केव्हाच दूर गेलेला असतो तिला सोडून,
पण नदी.... ती वाहत असते त्याच्या आठवणीत वेडी होउन
आपण ही असेच कोणाच्या प्रेमात पडतो, वाटत तो असेल आपल्या सोबत पण तो केव्हाच मागे राहीला असतो,
पण आपण  पुढे पुढे जात  असतो, त्याची सोबत समजून.... अगदी त्या वेड्या नदी सारखे वेडे होउन . .. .!!


No comments:

Post a Comment